Información
दिवसभर अनेक सोर्सेसमधून असंख्य बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात. पोहोचतात कसल्या, आदळतात. आणि या भडीमारात खूपदा खऱ्या महत्वाच्या बातम्या आपल्या नजरेतून सुटून जातात. त्यामुळे 'टॉक टाईम्स'मधून आम्ही दररोज रात्री 9 वाजता आपल्या भेटीला येणारोत दिवसभरातल्या 5 महत्वाच्या बातम्या घेऊन. ऐकायला विसरू नका टाईम्स नाऊ मराठीचा नवाकोरा करकरीत पॉडकास्ट 'टॉक टाईम्स' दररोज रात्री 9 वाजता. आपल्या सूचना आणि आपल्याला 'टॉक टाईम्स'मधून आणखी काय ऐकायला आवडेल हे आम्हाला कळवा या ईमेल आयडीवर- anki.apte@gmail.com
ऐकत राहा, टाईम्स नाऊ मराठीचा पॉडकास्ट 'टॉक टाईम्स'.
ऐकत राहा, टाईम्स नाऊ मराठीचा पॉडकास्ट 'टॉक टाईम्स'.
18 MAY. 2021 · आजची पहिली बातमी आहे ती महाराष्ट्राने पार केलेल्या लसीकरणाच्या विक्रमी आकड्याची. दुसरी बातमी आहे ती देशवासियांची चिंता वाढवणारी आहे. येत्या 6 ते 18 महिन्यांमध्ये देशात संसर्गाच्या लाटा येण्याची शक्यता डब्ल्यू एच ओनं व्यक्त केलीये. तिसरी बातमी ही मात्र थोडी आशादायक आहे. कोरोनाच्या संकटाविरोधातल्या सध्या सुरू असलेल्या लढाईत एक पाऊल पुढे पडलंय. चौथी बातमी आहे ती क्रीडा विश्वातली. आपल्या लाडक्या एबीडीच्या करियरबद्दलची. आणि आजची शेवटची बातमी आहे ती आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांच्या दुःखद निधनाची.
17 MAY. 2021 · आजची पहिली बातमी आहे ती तौते या चक्रीवादळाच्या मुंबईवर झालेल्या परिणामाची. या वादळामुळे मुंबईतलं पूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय. दुसरी बातमी ही कोरोनाविरोधात सध्या देश लढत असलेल्या लढाईत आपल्या मदतीसाठी आलेल्या डीआरडीओच्या औषधाबद्दलची. कोरोनाची गंभीर लक्षणं असलेल्यांना हे औषध दिलं जाणारे. तिसरी बातमी ही इस्रायल आणि पॅलेस्टाईनमधल्या सध्या सुरू असलेल्या तणावाबद्दलची, आणि अर्थातच जगाची चिंता वाढवणारी आहे. चौथी बातमी ही काँग्रेस नेत्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी सोशल डीस्टन्सिंगच्या उडालेल्या फज्जाची आहे. आणि पाचवी आणि शेवटची बातमी ही सामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी आहे, कारण महागाई दरात वाढ झालीये.
16 MAY. 2021 · आजची पहिली बातमी आहे ती काँग्रेसचे राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या दुःखद निधनाची. दुसरी बातमी ही ग्रामीण भागातला कोरोना रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या नियमावलीची. तिसरी बातमी आहे ऑक्सिमीटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचा काळाबाजार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने यांच्या किंमतीवर लावलेल्या निर्बंधांची. चौथी बातमी ही पीपीएफ, एनएससी आणि सुकन्या समृद्धीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाची आहे. आणि शेवटची म्हणजेच पाचवी बातमी आहे ती सलमान खानच्या भाई या फिल्मबद्दलची.
15 MAY. 2021 · आजची पहिली बातमी आहे ती देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना लिहिलेल्या पत्राची. दुसरी बातमी ही खारफुटी म्हणजेच मँग्रोव्ह्जच्या होत असलेल्या हानीची आहे. तिसरी बातमी ही पारनेरमध्ये लोकसहभागातून चालवण्यात येत असलेल्या कोव्हिड सेंटरची आहे. चौथी बातमी आहे भारतातल्या परकीय चलनाच्या साठ्याची. आणि आजच्या दिवसातली शेवटची बातमी आहे करीना कपूरच्या फिटनेस रुटीनची. लॉकडाऊनच्या काळात जिम्स बंद असल्यामुळे ज्यांना घरबसल्या आपलं वजन वाढेल याची काळजी वाटतीये त्यांनी ही बातमी लक्ष देऊन ऐका!
14 MAY. 2021 · आजची पहिली बातमी आहे ती धनंजय मुंडेंना सळो की पळो करून सोडणाऱ्या करुणा शर्मा मुंडे यांच्या आगामी पुस्तकाची. दुसरी बातमी ही रशियातून भारतात आलेल्या स्पुटनिक या कोरोनावरच्या लसीच्या किंमतीची आहे. तिसरी बातमी आहे लव्ह यू जिंदगी या गाण्यावर ताल धरताना व्हायरल झालेल्या युवतीच्या दुःखद मृत्यूची आहे. चौथी बातमी आहे बसीन कॅथलिक कोऑपरेटिव्ह बँकेतल्या पदभरतीची आहे, त्यामुळे potential उमेदवारांनी लक्ष द्या. आणि आजची पाचवी महत्वाची बातमी आहे ती व्हॉट्सअॅपच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीबद्दलची आहे. त्यामुळे सगळ्या व्हॉट्सअॅप यूजर्सनी कान देऊन ऐका.
13 MAY. 2021 · आजची पहिली बातमी आहे ती महाराष्ट्रातल्या लॉकडाऊनची. दुसरी बातमी ही महागाई भत्त्याविषयीची आहे. त्यामुळे नोकरदार मंडळींना कान देऊन ऐका. तिसरी बातमी ही फायझर आणि मॉडर्नाच्या लसी आणि डबल म्यूटंट कोरोना व्हायरसची आहे. चौथी बातमी ही नीरव मोदीबद्दलची आहे आणि पाचवी आणि शेवटची बातमी यूपीएससी परीक्षांबद्दलची. भविष्यात अधिकारी होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या आणि त्यासाठी मेहनत घेणाऱ्या यूपीएससी अॅस्पिरंट्ससाठी महत्वाची.
12 MAY. 2021 · आजची पहिली आहे ती गेल्या काही दिवसांपासून भलत्याच चर्चेत असणाऱ्या एपीआय सचिन वाझे यांच्या हकालपट्टीची. इंधन दरवाढीवरून जयंत पाटील यांनी केंद्रावर साधलेल्या निशाण्याची आहे आपली दुसरी बातमी. तिसरी बातमी आहे मराठा आरक्षणावरून आशीष शेलार यांनी उद्धव सरकारवर केलेल्या टीकेची, चौथी बातमी आहे रमजान ईदबाबत गृहमंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांबद्दलची, अर्थात, मुस्लिम बांधवांसाठी महत्वाची. आणि शेवटची बातमी आहे ती आपली चिंता काहीशी वाढवणारी आहे.
11 MAY. 2021 · आजची पहिली आणि महत्वाची बातमी आहे ती 18 वर्षांवरच्या नागरिकांच्या लसीकरणाची. दुसरी बातमी महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दलची आहे. तिसरी बातमी ही किनारपट्टीवरच्या चक्रीवादळाची आणि चौथी बातमी आहे गोव्यात घडलेल्या दुर्घटनेची. आणि पाचवी आणि शेवटची बातमी आहे रेल्वे विभाग आणि कोरोनाबद्दलची.
8 MAY. 2021 · On the occasion of National Technology Day, Times Now Marathi is launching its brand new podcast ‘Talk Times’. We will be meeting you at 9 pm everyday on ‘Talk Times’ with the most important news of the day, to make sure that you don’t miss out on any of the important news of the day in the tsunami of news from various sources! And we really value your opinions and suggestions, so please feel free to reach out to us on anki.apte@gmail.com.
So, stay tuned to ‘talk Times’!
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने टाईम्स नाऊ मराठी घेऊन येत आहे नवाकोरा पॉडकास्ट, ‘टॉक टाईम्स’. यातून आम्ही दररोज रात्री 9 वाजता तुमच्या भेटीला येणार आहोत दिवसभरातल्या पाच महत्वाच्या बातम्या घेऊन, जेणेकरून बातम्यांच्या आपल्यावर आदळणाऱ्या महापुरात कुठलीही महत्वाची बातमी निसटून जाणार नाही. आणि तुमची मतं आणि सूचना आम्हाला हक्काने सांगा, anki.apte@gmail.com या ईमेल आयडीवर.
आणि 11 मेपासून दररोज ऐकायला विसरू नका, ‘टॉक टाईम्स’!
दिवसभर अनेक सोर्सेसमधून असंख्य बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतात. पोहोचतात कसल्या, आदळतात. आणि या भडीमारात खूपदा खऱ्या महत्वाच्या बातम्या आपल्या नजरेतून सुटून जातात. त्यामुळे 'टॉक टाईम्स'मधून आम्ही दररोज रात्री 9 वाजता आपल्या भेटीला येणारोत दिवसभरातल्या 5 महत्वाच्या बातम्या घेऊन. ऐकायला विसरू नका टाईम्स नाऊ मराठीचा नवाकोरा करकरीत पॉडकास्ट 'टॉक टाईम्स' दररोज रात्री 9 वाजता. आपल्या सूचना आणि आपल्याला 'टॉक टाईम्स'मधून आणखी काय ऐकायला आवडेल हे आम्हाला कळवा या ईमेल आयडीवर- anki.apte@gmail.com
ऐकत राहा, टाईम्स नाऊ मराठीचा पॉडकास्ट 'टॉक टाईम्स'.
ऐकत राहा, टाईम्स नाऊ मराठीचा पॉडकास्ट 'टॉक टाईम्स'.
Información
Autor | Prashant Jadhav |
Organización | Prashant Jadhav |
Categorías | Noticias diarias |
Página web | - |
- |
Copyright 2024 - Spreaker Inc. an iHeartMedia Company